महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अधिकारी, लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याचे पालकमंत्री बापट यांचे आवाहन गुरुवार, १२ ऑक्टोंबर, २०१७
पुणे : जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. या तालुक्याचा विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त निधी कशा पद्धतीने मिळवता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करू. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी दोघांनी समन्वयाने काम केल्यास हे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.

शासकीय विश्रामगृह पुणे येथे आयोजित जुन्नर तालुक्यातील विविध विषयासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सुवेज हक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत श्री. बापट यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सकारात्मकतेने जनतेसाठी विकासाची कामे करत रहावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा