महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गणेशोत्सव डॉल्बीमुक्त झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानले आभार बुधवार, ०६ सप्टेंबर, २०१७
कोल्हापूर : कोल्हापुरातील गणेशोत्सव पूर्णपणे डॉल्बीमुक्त, शांततामय वातावरणात आणि उत्साहात साजरा झाला याबद्दल सर्व गणेश मंडळे, प्रशासन, नागरिकांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आभार मानून अभिनंदनही केले.

डॉल्बी लावण्याचा कायदा काय यापेक्षा ते आरोग्याच्या दृष्टीने चांगले की वाईट हा महत्वाचा मुद्दा असल्याने जनप्रबोधनासह अंमलबजावणीसाठी थोडा कठोरपणा घ्यावा लागला यातून डॉल्बीमुक्तीसाठी थोडी कडक भूमिका घेतल्याने जे दुखावले असतील त्यांच्या प्रती पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिलगिरीही व्यक्त केली.

डॉल्बीमुक्तीची भुमिका मांडत असताना अर्जुनाप्रमाणे आपण सत्यासाठी लढल्याचे सांगून यातून निर्माण झालेले मतभेद विसरुन विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोल्हापूर मध्ये स्किल डेव्हलपमेंट युनिर्व्हसिटी कोल्हापूर प्राधिकरणाची रचना आदी सर्व विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरुन एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा