महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महिलांची स्व-उन्नती ही घराची उन्नती - अमृता फडणवीस रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८
नागपूर महानगरपालिकेचा महिला उद्योजक मेळावा

नागपूर :
महिला चूल आणि मुल यापर्यंत मर्यादित न राहता घराबाहेर पडायला लागली आहे. स्वत:च्या पायावर उभी राहून स्वत:ला आणि समाजाला विकासाच्या वाटेने पुढे नेत आहे. त्यामुळे महिला स्वत: बरोबर घराच्या उन्नतीला हातभार लावत आहे. आज जरी उद्योग क्षेत्रात महिलांना ‘महिला उद्योजिका’ नावाने संबोधल्या जात आहे. परंतू येणाऱ्या काळात त्यांना केवळ उद्योजिका म्हणून नावलौकिक होईल, असा विश्वास ॲक्सिस बँकच्या उपाध्यक्षा श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिका द्वारा रेशीमबाग येथील मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार, सत्ताधारी पक्षनेता संदीप जोशी, हनुमान नगर झोनचे सभापती भगवान मेंढे, माजी महापौर प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, महिला व बाल कल्याण समितीच्या श्रीमती वर्षा ठाकरे, महानगरपालिकेच्या उपायुक्त श्रीमती डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त राजू भिवगडे दिव्या दुराडे, वंदना भगत प्रामुख्याने उपस्थित होत्या.स्त्री आणि पुरुष हे पक्षाच्या पंखाप्रमाणे आहे. दोन्ही पंख जोपर्यंत मजबूत नाहीत तोपर्यंत पक्षी उडू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने देखील महिलांना सुदृढ बनविण्याकरिता, त्यांना हक्काची जागा मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले आहे. त्यामुळे महिलांना स्वबळ तसेच श्रमाचे फळ मिळण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास देखील श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.

कार्यकमाचे संचालन किशोर गलांडे व आभार उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी मानले. यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने लाडली लक्ष्मी योजनेतंर्गत 690 बालिकांचा विमा काढण्यात आला. अशा विमा धारकांना अतिथीच्या हस्ते कागदपत्रे प्रदान करण्यात आली. याशिवाय मेळाव्यातील 11 महिला बचत गटांना आयोजकांच्या वतीने उत्कृष्ट स्टॉल करिता प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात सहभागी नागपूरचा पूत्र पीयुष गुलभेडे यांचाही श्रीमती फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जैन आंतरराष्ट्रीय ट्रेड संघटना
पगारिया फार्महाऊस येथे रविवारी जैन आंतरराष्ट्रीय ट्रेड संघटनेच्या महिला व युवक शाखेचे उद्घाटन ॲक्सीस बँकच्या उपाध्यक्षा श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जैन आंतरराष्ट्रीय ट्रेड संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा शर्मिला ओसवाल, पूर्व जोन महिला शाखेच्या अध्यक्षा श्रीमती सुमन जैन, जीतो युवक शाखेचे मुख्य सचिव सिद्धार्थ भंसाली, चाप्टर अध्यक्ष उज्ज्वल पगारिया, सचिव प्रतीक सरावगी, जीतो महिला शाखेच्या नवनिर्वाचीत अध्यक्षा अर्चना जव्हेरी, सचिव सीमा कोठारी, युवक शाखेचे नवनिर्वाचीत सचिव डेवीन कोठारी आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा