महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गारमेंट हबच्या जागेचे एमआयडीसीकडे प्रस्ताव द्या - सहकारमंत्री सुभाष देशमुख शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७
सोलापूर : चिंचोली एम.आय.डी.सी. मध्ये उपलब्ध असलेल्या जागांमधून सोलापूर गारमेंट हबसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितानी एमआयडीसीकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिल्या.

सोलापूरमध्ये गारमेंट उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. एमआयडीसीकडे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागा या उद्योगातील उद्योजकांना जागा उपलब्ध करून दिल्यास रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे. यासंदर्भात आज शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस श्रीकांत मैंदाळे, प्रादेशिक अधिकारी किरण सोनवणे, अशोक चव्हाण, क्षेत्र व्यवस्थापक डी.एस.इंगळे, श्री. सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे उपाध्यक्ष निलेश शहा तसेच सचिव अमीत जैन, एमआयडीसीचे उप अभियंता सुनील कोलप व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चिंचोली एमआयडीसीमधील ओपन स्पेसमधील जागा सोलापूर गारमेंट हबसाठी देण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. तसेच सध्या विना वापर असलेली चिंचोली एमआयडीसीमधील आय.टी.ऑफीससाठी बांधलेली इमारत तसेच अक्कलकोट येथील एमआयडीसीमध्ये मोकळी जागा सोलापूर रेडीमेड गारमेंट असोशिएशनला ऑफीस व ट्रेनिंगकरिता उपलब्ध करून देण्याबाबत आढावा घेण्यात आला.

एमआयडीसीच्या विविध कामांबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी एमआयडीसीतील रस्ते दुरुस्तीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री देशमुख यांनी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा