महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वृत्तपत्रांना बळ देण्याचे राज्य शासनाचे धोरण – माहिती संचालक यशवंत भंडारे सोमवार, ०७ जानेवारी, २०१९

बीड : वृत्तपत्रे व माध्यमांचे बदलते स्वरुप ध्यानात घेवून नवीन जाहिरात धोरण 2018 मध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे बदल करण्यात आल्याने याचा उपयोग वृत्तपत्रांना जाहिरात दरांमध्ये मोठी दरवाढ मिळण्यात होईल याद्वारे जवळपास दीडशे पट अधिक दर मिळतील याचाच अर्थ वृत्तपत्रांना बळ देणारे राज्य शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) यशवंत भंडारे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा बीड शाखेच्या वतीने आयोजित दर्पण दिन कार्यक्रमात श्री.भंडारे बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक नामदेव क्षीरसागर, अशोक देशमुख, दिलीप खिस्ती, मुकदुम काझी, पत्रकार संघाच्या वतीने दर्पण पुरस्कार मिळणारे सत्कारमूर्ती  संपादक राजेंद्र आगवान, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे, संतोष मानुरकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश कोठेकर, सत्यनारायण कलंत्री आदी उपस्थित होते.     

संचालक श्री.भंडारे म्हणाले यापूर्वी देशमुख समितीच्या जाहिरात धोरणानुसार 2001 ते 2018 कार्यवाही सुरु होती. नवीन जाहिरात लागू होतांना चार प्रकारच्या माध्यमांचा विचार केला गेला आहे असे दिसून येते. या मुद्रित, ईलेक्ट्रानिक, डिजिटल अर्थात सोशल मीडिया आदींचा विचार झाला आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे सांगता येईल तसेच जाहिरात संदेश कसा असावा आणि कोणासाठी आहे याचाही विचार केला गेला आहे.

ते म्हणाले पूर्वीच्या जाहिरातींचा दर विचार करता आता मिळणारी मोठी वाढ देतांना अ, , क ही वर्गवारी न ठेवता मोठी, मध्यम, लघु वृत्तपत्रे असे प्रकार केले आहेत. याच बरोबर त्यांचा सामाजिक, आर्थिक स्तर वेगवेगळ्या समाज घटकांपर्यत पोहोचण्याची क्षमता पाहिली जाईल. संबंधित जाहिरात देतांना त्या वृत्तपत्राचा वाचक वर्ग निश्चित कोणता आहे. हे सुद्धा गरजेचे ठरेल जाहिरात संस्था पूर्वी यापद्धतीने काम करत असत असे अभ्यासपूर्ण विवेचन संचालक श्री.भंडारे यांनी केले.

यावेळी विविध विक्रेत्यांनी, संपादक व ज्येष्ठ पत्रकार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थित प्रतिनिधींनी जाहिरात धोरणाच्या अनुषंगाने विचारलेले प्रश्न शंका आदींना श्री.भंडारे यांनी समर्पक उत्तरे दिली. याप्रसंगी त्यांच्या हस्ते श्री.आगवान यांना दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या पत्रकार दिन कार्यक्रमात संचालक यशंवत भंडारे यांचे मार्गदर्शन

सामाजिक न्याय भवन सभागृहात बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दर्पण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलतांना संचालक(माहिती) यशवंत भंडारे म्हणाले, बदलत्या काळात माध्यमांच्या स्थितीबाबत चिंतन करुन दिशा ठरवणे महत्त्वाचे आहे. नव्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक पत्रकार बनत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला अभिव्यक्त होण्याची संधी मिळत आहे. माहिती तंत्रज्ञानाची साधने त्याच्या हातामध्ये आली आहेत. पत्रकार व या क्षेत्रातील प्रत्येकास मुल्ये ठरवून काम करावे लागेल. पत्रकार, माध्यम यांच्या वरील जबाबदारी वाढत आहे. त्यांच्यामधील जबाबदारीच्या जाणीवा या देश, राज्य व समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन श्री.भंडारे यांनी केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पत्रकार, वृत्तपत्र आणि प्रशासनाचे संबंध सौहार्दाचे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकारांचे प्रश्न आणि त्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक राहून त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासन सक्षम पाठपुरावा करेल असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास दै.लोकमत औरंगाबादचे संपादक सुधीर महाजन, बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, जेष्ठ पत्रकार अशोक देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस अनिल महाजन, जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी  श्री.महाजन, श्री.देशमुख, श्री.क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष श्री.चौरे यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा