पुणे : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, उद्योजक, सामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे आज अनेकांनी मदतीचे धनादेश सुपुर्द केले.
पूरग्रस्त भागात गतीने पुनर्बांधणी व्हावी, पूरग्रस्त भागातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचा संसार नव्याने उभा करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.