महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पंडित जवाहरलाल नेहरु यांना मुख्यमंत्र्यांचे विनम्र अभिवादन मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७
नागपूर : भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

रामगिरी येथे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख तसेच मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी आदींनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा