महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी -२०१९’ जाहीर शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

 

 

नवी दिल्ली : देशातील राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांनी जनतेला प्राथमिक ऊर्जा पुरवठा करण्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तयार करण्यात आलेल्या राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी-२०१९’ मध्ये  महाराष्ट्र  अग्रेसर राज्य ठरले आहे. 

येथील प्रवासी भारतीय भवनमध्ये आयोजित  केंद्रीय ऊर्जानवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने मंत्रालयाच्या विविध योजना व कार्यक्रमांच्या आढावा बैठकीत केंद्रीय ऊर्जानवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंह यांच्या हस्ते  आज राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी 2019 प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत  देशातील अग्रेसर राज्य व केंद्र शासीत प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.
केंद्रीय ऊर्जा नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने घालून दिलेल्या महत्त्वपूर्ण 97 मानकांच्या आधारे ऊर्जा कार्यक्षमतेबाबत देशातील 36 राज्य आणि केंद्रशासीत  प्रदेशांनी केलेल्या उपायोजनांचा अभ्यास करून राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी तयार करण्यात आली आहे. अलायंस फॉर इफिसीयंट इकोनॉमी आणि ऊर्जा दक्षता ब्युरो या संस्थांनी राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी -2019 तयार केली आहे.
राज्यात ऊर्जा बचत आणि उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून केलेल्या कार्यक्षम वापराची दखल या यादीत घेण्यात आली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, केरळ, कर्नाटकहिमाचल प्रदेशउत्तराखंडपुडुचेरी आणि चंडीगड या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांचा या यादीत समावेश आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा