महान्यूज महाराष्ट्र
About Mahanews

महान्यूजमधील सदरांची थोडक्यात माहिती


महान्यूजमध्ये मुख्य बातमी आणि महाराष्ट्रातील बातम्या दैनंदिन अपलोड केल्या जातात. उर्वरित सदरांचा मजकूर नियमित अपलोड करण्यात येतो. सर्व बातम्या व सदरे छायाचित्रासह प्रसिध्द करण्यात येतात. या सदरांचा तपशील पुढीलप्रमाणे :

१. मुख्य बातमी : राज्य शासनाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची घटना अथवा बातमीचे वृत्तांकन या सदरामध्ये करण्यात येते.

२. बातम्यांतील महाराष्ट्र : महान्यूजमध्ये मुख्य बातमी व्यतिरिक्त राज्यातील सर्व जिल्ह्यांतील प्रमुख घटना-घडामोडी अथवा कार्यक्रमांच्या जिल्हानिहाय बातम्या याठिकाणी देण्यात येतात.

३. यशकथा : राज्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची व प्रयत्नांची दखल या सदराअंतर्गत घेण्यात येत आहे. अगदी साध्यासाध्या प्रयोगातून साकारलेले विश्व सर्वांनाच प्रेरणादायी ठरावे, हा हेतू यामागे आहे.

४. योजना : शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि निर्णयांचा विस्तृत स्वरुपात आढावा घेणारे हे सदर आहे.

५. फर्स्ट पर्सन : काही प्रसंग, घटना, स्थळ, व्यक्ती अशा असतात की त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते त्या कार्यक्रमांवर आधारित वृत्तांत यामध्ये देण्यात येतो.

६. वेचक-वेधक : दिनविशेष, ज्याबद्दल आवर्जुन वाचावे याबाबतची माहिती.

७. जय महाराष्ट्र : सह्याद्री वाहिनीवरील जय महाराष्ट्र या कार्यक्रमाचा वृत्तांत

८. दिलखुलास :
आकाशवाणीवरुन सादर होणाऱ्या दिलखुलास कार्यक्रमाबाबत माहिती.

९. महाभ्रमंती : राज्यातील पर्यटन स्थळे आणि सोयीसुविधांची माहिती.

१०. करिअरनामा : करिअरच्या उपलब्ध संधीबाबतची माहिती.

११. नेटभेट : या सदरामध्ये मंत्री, सचिव यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती देण्यात येतात. आपण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक इ. मान्यवरांच्या मुलाखती पाठवू शकतात.

१२. नोकरी शोधा? : युवकांना विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या रोजगार संधींची तत्काळ माहिती या सदराद्वारे उपलब्ध करून देण्यात येते. आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक रोजगार संधीची माहिती या सदराद्वारे महान्यूजवर उपलब्ध करून देण्यात आली. या सदराविषयी युवकांच्या चांगल्या प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत.

१३. लोकराज्य : दर महिन्याचा लोकराज्यचा अंक पीडीएफ स्वरुपात येथे उपलब्ध आहे.

१४. सुलभ संदर्भ :
महाराष्ट्राची माहिती (आकडेवारीसहित), जिल्हा निहाय माहिती, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मंत्री यांचा परिचय आणि छायाचित्र तसेच राज्यातील आमदार, खासदार यांचे मतदारसंघ, पत्ते व संपर्क क्रमांक या सदरात प्रकाशित करण्यात आले आहेत.

१५. छायाचित्र दालन : राज्यातील विविध स्थळे, घटना, महत्त्वाचे समारंभ आणि राज्याचा विकास प्रतिबिंबित करणारे विषय यासंबंधीच्या सुंदर छायाचित्रांचा नजराणा या सदरातून देण्यात येतो.

१६. चित्रफित दालन: राज्यातल्या महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमांच्या ध्वनी चित्रफित येथे उपलब्ध आहेत.
--------