महान्यूज नोकरी शोधा ?
संधी रोजगाराची खात्री नोकरीची शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७
उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी !वाशिम नगरपरिषदामध्ये विविध पदांच्या ३३ जागा
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत वाशिम नगर परिषदामध्ये राज्यस्तरीय संवर्गातील महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रीकी सेवा पर्यवेक्षक (६ जागा), महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व सहाय्यक लेखा परीक्षण (१ जागा), महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारक व प्रशासकीय सेवा (१८ जागा), महाराष्ट्र नगर परिषद अग्नी शमन सेवा (८ जागा) अशा एकूण ३३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.washim.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ग्रुप ‘सी’ सिव्हिलियन पदाची भरती (१४ जागा)
एचक्यू ५४ मुव्हमेंट कंट्रोल ग्रुप द्वारा ग्रुप सी सिव्हिलियन पदाच्या एलडीसी (५ जागा), टॅली क्लार्क (१ जागा), कूक (२ जागा), एमटीएस (सफाईवाला) (३ जागा), एमटीएस (वॉचमेन) (३ जागा), बार्बर (न्हावी) (१ जागा), वॉशरमन (१ जागा) अशा एकूण १४ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवस आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ११ ते १७ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात उपलब्ध आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २३१३ जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २३१३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च २०१७ आहे. अधिक माहिती www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दि. ५ ते २० फेब्रुवारी दरम्यान सैन्य भरती मेळावा
सेना भरती कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत सोरेगाव (सोलापूर) येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 05 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017 या दरम्यान स्पोर्टस ग्राऊंड, एसआरपीएफ कॅम्प, सोलापूर येथे करण्यात आले आहे. या सैन्य भरती मेळाव्यामध्ये 6 व 7 फेब्रुवारी रोजी सोलापूर, दि. 7 व 10 फेब्रुवारी 2017 रोजी औरंगाबाद, 8 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग, गोवा व पुणे, 11 ते 13 फेब्रुवारी रोजी सातारा, 15 ते 16 फेब्रुवारी रोजी सांगली आणि 17 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांची भरती प्रक्रिया होणार आहे.

मोटार वाहन विभागात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या १८८ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गृह (परिवहन) विभागाअंतर्गत मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट-क) पदाच्या १८८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

होमी भाभा राष्ट्रीय संस्थेमध्ये रजिस्टार पदाची जागा
होमी भाभा राष्ट्रीय संस्थेमध्ये रजिस्टार पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.hbni.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात वरिष्ठ तांत्रिक सहायक पदाची भर्ती
केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात कनिष्ठ तांत्रिक सहायक (मास एज्युकेशन ॲण्ड मीडिया) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवस आहे. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजचा दि. २१ ते २७ जानेवारी २०१७ चा अंक पहावा.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीमध्ये विविध पदांच्या ४ जागा
महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या मुंबई कार्यालयात उप-प्रबंधक (१ जागा), मुख्य लिपीक (१ जागा), लेखापाल (१ जागा), शिपाई (१ जागा) अशा एकूण ४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती https://www.mchmumbai.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय संसदेत संसदीय वार्ताहर पदाच्या २० जागा
भारतीय संसदेतील लोकसभा सचिवालयात संसदीय वार्ताहर श्रेणी-II (गट-अ) या पदाच्या २० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती http://www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आयडीबीआय बँकेत व्यवस्थापक पदाच्या १११ जागा
आयडीबीआय बँक लि.मध्ये उप महा व्यवस्थापक ग्रेड-डी (१३ जागा), सहाय्यक महा व्यवस्थापक ग्रेड-सी (१७ जागा) आणि व्यवस्थापक ग्रेड-बी (८१ जागा) अशा एकूण १११ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.idbi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन
सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.

 
'नोकरी शोधा’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा