महान्यूज नोकरी शोधा ?
संधी रोजगाराची खात्री नोकरीची बुधवार, ०७ डिसेंबर, २०१६
उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (पूर्व परीक्षा) पदाच्या ७५० जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस दलातील गट ब(अराजपत्रीत) संर्वगातील ‘पोलीस उपनिरीक्षक’ पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ डिसेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त पदाच्या ७ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्त (७ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या १५७ जागा
भाभा अणुसंशोधन केंद्रात प्लाण्ट ऑपरेटर (२० जागा), अटेण्डंट ऑपरेटर (केमिकल प्लाण्ट) (७ जागा), लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लाण्ट) (५ जागा), फिटर (२ जागा), मशिनिस्ट (१ जागा), मेण्टेनन्स मॅकेनिक (केमिकल प्लाण्ट) (१९ जागा), वेल्डर (जीएमएडब्ल्यू व जीटीएडब्ल्यू)(८ जागा), टर्नर (२ जागा), ए/सी मेकॅनिक (4 जागा), इन्स्ट्रुमेण्ट मेकॅनिक (केमिकल प्लाण्ट) (६ जागा), इलेक्ट्रिशियन (३९ जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (९ जागा), मेकॅनिक ऑटोमोबाइल (ॲडव्हान्स्ड डिझेल इंजिन) (२ जागा), मेकॅनिक-रिपेअर्स ॲण्ड मेण्टेनन्स ऑफ हेवी व्हेइकल (२ जागा), मेकॅनिक (मोटार व्हेइकल) (४ जागा), मेसन (१४ जागा), पेंटर (५ जागा), प्लंबर (३ जागा), कार्पेटर (५ जागा) अशा एकूण १५७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.barc.gov.inwww.barcrecruit.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्ट उपक्रमात बसचालक पदाच्या ९६१ जागा
बेस्ट उपक्रमात बेस्टचालक (९६१ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर २०१६ आहे. अधिक माहिती http://bestundertaking.com/ तसेच http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाजेनकोमध्ये अधिकारी पदाच्या ५ जागा
महाजेनकोमध्ये वैद्यकीय अधीक्षक (१ जागा), सहायक वैद्यकीय अधिकारी (४ जागा) अशा एकूण ५ जागांसाठी अर्ज मागविण्या येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ डिसेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर तसेच दै.लोकसत्ताच्या दि. १७ नोव्हेंबर २०१६ रोजीचा अंकात उपलब्ध आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात नियामक अधिकारी पदाची जागा
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगामध्ये नियामक अधिकारी (तांत्रिक) पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.merc.gov.in/ तसेच www.mercindia.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई मध्ये विविध पदांच्या ९ जागा
भारतीय प्रोद्योगिकी संस्थान, मुंबई येथे सहायक सुरक्षा निरीक्षक (महिला) (२ जागा), हार्डवेअर सहायक (१ जागा), डेंटल आयजिनिस्ट (२ जागा), इन्स्ट्रुमेंट ऑपरेटर (४ जागा) अशा एकूण ९ जागा कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ डिसेंबर २०१६ आहे. अधिक माहिती http://www.iitb.ac.in/encareers/staff-recruitment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन
सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.

 
'नोकरी शोधा’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा