महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदार जागृती अंतर्गत जलतरण तलावात प्रात्यक्षिके सोमवार, २२ एप्रिल, २०१९

सिंधुदुर्ग : स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत व मास्टर्स अमेच्युअर अक्वेटिक्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा जलतरण तलाव, जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग याठिकाणी मानवी साखळीचे आयोजन दिनांक 21 एप्रिल 2019 रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा प्रशासन अधिकारी व स्वीपचे संयोजक संतोष जिरगे व अन्य अधिकारी उपस्थित होते.    

यावेळी जलतरण तलावात प्रशिक्षण घेणाऱ्या 50 प्रशिक्षणार्थींनी मानवी साखळीद्वारे VOTE ही अक्षरे पाण्यावर तयार करुन नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. तसेच 4 ते 6 वर्षे वयोगटातील छोट्या जलतरणपट्टुंनी पाण्यामध्ये मशाल ड्रिल केली. तसेच पोहण्याच्या विविध प्रकारांचे राज्य व राष्ट्रीय खेळाडूंकडून प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. स्वीप संयोजक संतोष जिरगे व जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण प्रवीण सुलोकर,  प्रकाश वराडकर व कीर्ती सुलोकर यांनी दिले. यावेळी डॉन बॉस्को हायस्कूलचे स्काऊट गाईडचे पथक उपस्थित होते. क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी व मनीषा पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा