महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अंबड येथील गोदामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतमोजणी केंद्र असलेल्या अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी भेट देऊन पाहणी केली

नाशिक दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे २३ मे २०१९ रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने सदर मतमोजणी केंद्रांत मतदान केंद्रातून येणाऱ्या मतपेट्यांची वाहतूक पार्किंग व्यवस्था, अग्निशमन तसेच विद्युत व्यवस्था, मतमोजणी केंद्रात पुरेशी हवा प्रकाश व्यवस्था, इंटरनेट सुविधा तसेच मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणाबाबत कायदा सुव्यवस्था याबाबींचा यावेळी आढावा घेतला. त्याअनुषंगाने २९ एप्रिल रोजी मतदानानंतर मतदान केंद्रांकडून प्राप्त झालेल्या मतदान साहित्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव पोलीस दल, पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत ठेवण्यात येणाऱ्या कडेकोट बंदोबस्ताचा आढावा देखी यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतला.

मतमोजणी केंद्र पाहणीच्या वेळी अपर जिल्हाधिकारी तथा २० दिंडोरी लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, अपर जिल्हाधिकारी गितांजली बाविस्कर, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, अमोल तांबेनोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या उपमहानिरीक्षक सरिता नरके, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, हरिभाऊ पाडोळ, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल आदी अधिकारी उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा