महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सखी व सक्षम मतदान केंद्रात मतदारांनी केले उत्स्फुर्तपणे मतदान गुरुवार, १८ एप्रिल, २०१९

लातूर : 41- लातूर लोकसभा मतदरासंघात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सक्षम मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली. लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर, निलंगा, लोहा व औसा या ठिकाणी सक्षम (दिव्यांग विशेष) मतदान केंद्रावर तसेच सखी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मतदारांनी  उत्स्फुर्तपणे मतदानाचा हक्क बजावला.

41- लातूर लोकसभा (.जा.) मतदार संघात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जी.श्रीकांत यांचे विशेष प्रयत्नातून स्वीप अंतर्गत जिल्हयात मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता विविध कार्यक्रमातून मतदान जनजागृती करण्यात आली. सखी व सक्षम या केंद्रात मतदारांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती.

यामध्ये दोन्हीही  मतदान केंद्रात येणाऱ्या महिलांना हळदी कुंकु लावून स्वागत करण्यात येत होते. तसेच त्यांच्या सोबत येणाऱ्या लहान मुलांकरीता विशेष बाल संगोपन कक्षाची स्थापना करण्यात आली होती. अचानक एखाद्या मतदारास अरोग्य विषयक त्रास झाला तर त्वरीत उपचार मिळावा या करीता आरोग्य कक्षाचीही स्थापना करण्यात आली होती. या मतदान केंद्रात विविध सजावट करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

यावेळी दिव्यांग व्यक्तींना मतदानाकरीता व्हीलचेअर, रॅम्प, बसण्याकरिता विशेष सोय दिव्यांग व्यक्तीचे फूल देऊन स्वागत करण्यात येत होते. मतदारास उन्हा पासून संरक्षण व्हावे याकरीता शामीयाना उभारण्यात आला होता.

या सोयी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे महिलांनी त्स्फुर्तपणे मतदान करण्याकरीता रांगा लावल्या होत्या.या ठिकाणी सेल्फी पॉईंटची फोटो काढण्यासाठी विशेष सोय करण्यात आली होती. या दोन्ही मतदान केंद्रास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त एम.डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी भेट देऊन  मतदान केंद्राची पाहणी  करुन समाधान व्यक्त केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा