Mahanews
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
लोकराज्य



'अपूर्व महाराष्ट्र'
रविवार, ७ फेब्रुवारी, २०१०

लोकराज्यचे न्यू लूक जसे वाचकांना आवडले तसेच लोकराज्य आणि त्याच्या विशेषांकांचेही वाचकांशी नाते जोडले गेले आहे. लोकराज्यच्या प्रत्येक विशेषांकाला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यांची त्यांनी प्रशंसाही केली आहे.

नुकताच लोकराज्यने 'पर्यटन विशेषांक' प्रकाशित केला होता. या अंकालाही असाच मोठा प्रतिसाद मिळाला. त्या अंकासाठीही वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया पाठविल्या.

नंदुरबारचे राहूल पाडवी यांनी म्हटले आहे, मुख्यत: पर्यटन विशेषांक हा महाराष्ट्र राज्याला समर्पित होता. महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे हे सिद्ध होते. शिर्डीपासून ते महालक्ष्मीपर्यंत, उत्तरेच्या सातपुड्यापासून ते नागपूरच्या घनदाट अरण्यापर्यंत, शेगावपासून ते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापर्यंत, नांदेडच्या गुरूद्वारपासून अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी तीर्थस्थळ, निसर्गरम्य ठिकाण, पर्यटन स्थळं आहेत. या स्थळांनी महाराष्ट्राचा इतिहास व सांस्कृतिक वारसा अजुनही जतन केलेला आढळतो. लोकराज्यने या अपूर्व महाराष्ट्राचे चित्र वाचकांसमोर ठेवल्याबद्दल लोकराज्यला धन्यवाद!

वाचकांच्या प्रतिसाद आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद...

केवळ ५० रुपयांत लोकराज्यचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधा -
मनीषा पिंगळे, सहायक संचालक (माहिती), वितरण विभाग,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन,
बरॅक नं. १९, फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई- ४०० ०२१
दूरध्वनी क्र. (०२२) २२०२१५३०, २२०२३९५७, मोबाईल क्र. ९४ २३२ २८८६२



'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
ई बातमी
Copyright DGIPR and Government of Maharashtra About Us  |  Team  |  Contact us  |  Feedback  |  Terms of use |  Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768 Developed by OneUpDesigns
A Yass Multimedia Project
Total visits : 3219744