बातम्यातील महाराष्ट्र
शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४
 • चित्रफीत दालन
  उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या महाऑपमध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!

  एमपीएससीमार्फत पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेद्वारे 260 जागांसाठी भरती
  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षकांची 260 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2014 आहे. अधिक माहिती
  www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  एमपीएससीमार्फत उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयातील सहयोगी प्राध्यापकाच्या 65 जागांसाठी भरती
  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयातील सहयोगी प्राध्यापक – स्वयंचल अभियांत्रिकी (4 जागा), माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी (5 जागा), संगणक अभियांत्रिकी (5 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी (5 जागा), अणुविद्युत/दुरसंवेदन अभियांत्रिकी (8 जागा), विद्युत अभियांत्रिकी (10 जागा), यंत्र अभियांत्रिकी (20 जागा), उपकरणीकरण (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2014 आहे. अधिक माहिती https://www.mahaonline.gov.in www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


  केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे 582 जागांसाठी भरती
  केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2014ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे अभियांत्रिकीच्या विविध विभागातील सुमारे 582 जागा भरण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 22-28 मार्च 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.inwww.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेद्वारे 875 जागांसाठी भरती
  केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2014ची घोषणा करण्यात आली आहे. या परिक्षेद्वारे वैद्यकीय सेवांमधील एकूण 875 जागा भरण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 22-28 मार्च 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.inwww.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  स्टाफ सिलेक्शनमार्फत हिंदी भाषांतरकार, हिंदी प्राध्यापक व वरिष्ठ/कनिष्ठ भाषांतरकार या पदांसाठी भरती
  कर्मचारी निवड मंडळामार्फत (एसएससी) कनिष्ठ हिंदी भाषांतरकार, हिंदी प्राध्यापक व वरिष्ठ/कनिष्ठ भाषांतरकार या पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 22-28 मार्च 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


  देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टी एचक्यू येथे 20 जागा
  देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टी एचक्यू येथे कनिष्ठस्तर लिपिक (3 जागा), कूक (1 जागा), दफ्तरी (2 जागा), जेस्टनर ऑपरेटर (1 जागा), जामेदार आर्टि लश्कर (1 जागा), हेड गार्डनर (1 जागा), रेंज लश्कर (4 जागा), आर्टी लश्कर (1 जागा), गार्डनर-मल्टिटास्किंग (1 जागा), सफाईवाला –मल्टिटास्किंग (1 जागा), वॉशरमन (1 जागा), न्हावी (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 15-21 मार्च 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.


  पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत 13 जागा
  पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत अधिष्ठात-टेलिव्हिजन (1 जागा), प्राध्यापक –सिनेमॅटोग्राफी (1 जागा), प्राध्यापक-स्क्रिन प्ले रायटिंग (1 जागा), प्राध्यापक-एडिटिंग (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-फिल्म डायरेक्शन (2 जागा), सहयोगी प्राध्यापक –साऊंड इंजिनिअरिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-साऊंड रेकॉर्डिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-एडिटिंग (2 जागा), सहायक प्राध्यापक-सिनेमॅटोग्राफी (2 जागा), सहायक प्राध्यापक-टीव्ही प्रॉडक्शन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


  ‘महाऑप’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

Total visits : 14485711, Today's Visits : 1858
Last Updated :
विविध सदरांत प्रसिध्द झालेला मजकूर ही त्या त्या लेखकाची मते आहेत. त्या मतांशी शासन सहमत असेलच असे नाही. व्यक्तींची नावे, आकडेवारी , जुने संदर्भ यांच्या अचूकतेसाठी मूळ स्रोतांद्वारे माहिती घेणे योग्य आहे.
Mahaonline Logo