महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नागपूर विभाग
गडचिरोली
बुधवार, २३ जुलै, २०१४
नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शासन कर्तव्यदक्ष आहे - महेश झगडे
गडचिरोली : तंबाखू नियंत्रणाकरिता शासनाने कठोर कायदे केले आहेत. व्यसन ही सामाजिक समस्या असून त्याला आळा घालण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शासन कर्तव्यदक्ष आहे, असे प्रतिपादन अन्न व औषधी प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी केले. जिल्हाधिकारी...
गुरुवार, ०३ जुलै, २०१४
आत्मसमर्पण योजनेत लवकरच आमूलाग्र बदल - पालकमंत्री
गडचिरोली : वाट चुकलेले नक्षलवादी लोकशाहीवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे येण्यास तयार असतील तर शासन सुडाने वागण्याची भूमिका घेणार नसून दोन पावले पुढे टाकण्यास तत्पर आहे. आत्मसमर्पण योजनेत नक्कीच उणिवा आहेत, त्या उणिवा दूर करण्यासाठी येत्या १५ दिवसांत आत्मसमर्पण...
गोंदिया
शनिवार, १२ जुलै, २०१४
जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी अथक प्रयत्न आवश्यक - छगन भुजबळ
गोंदिया : जिल्ह्याचा विकास करण्यासाठी लक्षवेधी प्रयत्न करावे लागतात व त्यानंतरच विविध विकासकामे प्रत्यक्षात पार पडतात. विकासकामांचा पाठपुरावा करुन अनेक अडचणींवर मात करावी लागते, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केले. कोहमारा-गोंदिया-बालाघाट...
शुक्रवार, ११ जुलै, २०१४
अन्नसुरक्षाविषयक तक्रारी तात्काळ निकाली काढा - अनिल देशमुख
गोंदिया : अन्नसुरक्षा कायद्याच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या लाभार्थ्यांच्या तक्रारींवर गांभीर्याने विचार करुन संबंधित तक्रारकर्त्यांना सुनावणीची संधी देण्याबरोबरच त्या तक्रारी तात्काळ निकाली काढण्यात याव्यात, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी...
चंद्रपूर
सोमवार, २८ जुलै, २०१४
वन्यप्राणी-मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा - प्रविणसिंह परदेशी
चंद्रपूर : वन्यप्राणी-मानव संघर्षाबाबत वन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश प्रधान सचिव (वने) प्रविणसिंह परदेशी यांनी वनविभागाला दिले. वाघ असलेल्या क्षेत्राबाबत परिसरातील नागरिकांना अवगत करुन सदर क्षेत्रात नागरिकांना व त्यांच्या...
शुक्रवार, ११ जुलै, २०१४
आदिवासी व अनुसूचित जातीच्या प्रमाणात निधी देणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य-शिवाजीराव मोघे
चंद्रपूर : समाजातील दुर्लक्षित घटकासाठी काम करणारा सामाजिक न्याय विभाग असून आदिवासी व अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. सिंदेवाही...
नागपूर
गुरुवार, २४ जुलै, २०१४
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेला प्रथम पुरस्कार
नागपूर : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानांतर्गत सन 2013 मध्ये झालेल्या विभागीय स्तरावरील स्पर्धेत नागपूर महानगरपालिकेला प्रथम पारितोषिक मिळाला. विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी महापौर अनिल सोले यांना शाल, श्रीफळ, 1 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र...
बुधवार, २३ जुलै, २०१४
विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
नागपूर : विभागीय आयुक्त तथा विभागीय क्रीडा संकूल समितीचे अध्यक्ष अनूप कुमार यांनी बुधवारी समितीची बैठक घेऊन झालेल्या कामाचा व प्रगतीपथावरील कामांचा आढावा घेतला. या बैठकीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, कार्यकारी...
भंडारा
शुक्रवार, ११ जुलै, २०१४
बियाणे व पाणी टंचाईबाबत उपाययोजना त्वरित करावी - अनिल देशमुख
भंडारा : संपूर्ण राज्यातील जनतेला पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. ही संभाव्य शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारी बियाणे, पाणी टंचाईसाठीच्या उपाययोजना आणि जनावरांसाठी चारा याचे...
गुरुवार, १२ जून, २०१४
मत्स्य व्यावसायिकांनी उद्योजक व्हावे - विभागीय आयुक्त
भंडारा : विदर्भात गोड्यापाण्याच्या जलसाठ्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. या जलसाठ्याचा उपयोग करुन मत्स्यपालनाला विकासाचा केंद्रबिंदू ठेवून ॲडव्हाँटेज विदर्भाला चालना देता येईल. मत्स्यसहकारी संस्थांनी उद्योजक व्हावे. या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून...
वर्धा
रविवार, २७ जुलै, २०१४
शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपाला राष्ट्रीयकृत बँकांनी प्राधान्य द्यावे - उपमुख्यमंत्री
वर्धा : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठीचे अनुदान बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वर्धा जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत...
रविवार, २७ जुलै, २०१४
ई-जिल्हा प्रकल्पामुळे जनतेला मिळणार जलद सेवा - उपमुख्यमंत्री अजित पवार
वर्धा : नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वर्धा ई जिल्हा प्रकल्पाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी अधिवास प्रमाणपत्रासह महसूल विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या दहा सुविधांचे दाखले उपमुख्यमंत्र्यांच्या...