महान्यूज नोकरी शोधा ?
संधी रोजगाराची खात्री नोकरीची शुक्रवार, २२ जुलै, २०१६
उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!


इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सिक्युरिटी असिस्टंट पदाची भरती
गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सिक्युरिटी असिस्टंट (मोटर्स ट्रान्सपोर्ट) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट २०१६ असून अधिक माहिती www.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी पदाच्या १८२ जागा
भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी पदाच्या (श्रेणी-ब) थेट भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आयबीपीएस अंतर्गत प्रोबेशनरी अधिकारी पदांची एकत्रित भरती
इन्स्टिटयूट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) अंतर्गत बँकामध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदासाठी एकत्रित पद भरती प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये कनिष्ठ हिंदी भाषांतरकाराच्या ८ जागा
भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये डीएईच्या कॉन्स्टिट्यूयंट युनिट्समध्ये कनिष्ठ हिंदी भाषांतरकाराच्या गट-ब पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.barcrecruit.gov.in किंवा www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये दिव्यांग संवर्गातील टेक्निशिअन/बी (रिसेप्शनीस्ट) पदांच्या २ जागा
भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये दिव्यांग संवर्गातील टेक्निशिअन/बी (रिसेप्शनीस्ट) पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०१६ आहे. अधिक माहिती www.barcrecruit.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गृह व्यवहार मंत्रालयात विविध पदांच्या ६ जागा
गृह व्यवहार मंत्रालय अंतर्गत डायरेक्टोरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये हेड कॉन्स्टेबल (पायोनिअर) (२), हेड कॉन्स्टेबल (सुतार/गवंडी) (१), हेड कॉन्स्टेबल (फिटर/लोहार) (२), कॉन्स्टेबल (१) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस असेल. अधिक माहिती www.bsf.nic.in या संकेतस्थळावर तसेच दै.सकाळच्या दि. २ जुलै २०१६ रोजीच्या अकांत उपलब्ध आहे.

सशस्त्र सीमा दलात विविध पदांच्या २०६८ जागा
सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) (पुरुष) (७३१ जागा), कॉन्स्टेबल कुक (पुरुष)(३४९ जागा), कॉन्स्टेबल कुक (महिला)(६० जागा), कॉन्स्टेबल (वॉशरमन)(पुरुष) (१७० जागा), कॉन्स्टेबल (वॉशरमन)(महिला) (३० जागा), कॉन्स्टेबल (बार्बर) (पुरुष) (८२ जागा), कॉन्स्टेबल (बार्बर) (महिला) (१५ जागा), कॉन्स्टेबल सफाईवाला (पुरुष) (१७६ जागा), कॉन्स्टेबल सफाईवाला (महिला) (३० जागा), कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) (पुरुष) (३९५ जागा), कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) (महिला) (३० जागा) अशा एकूण २०६८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख एम्प्लॉयमेंट न्यूज (दि.१८ ते २४ जून २०१६) मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत आहे. अधिक माहिती www.ssbrectt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन
सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.

 
'नोकरी शोधा’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा