महान्यूज नोकरी शोधा ?
संधी रोजगाराची खात्री नोकरीची सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६
उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!


नागरी सेवा परीक्षा-२०१७ पूर्व प्रशिक्षण वर्ग (प्रवेश क्षमता ७०)
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा-२०१७ च्या विनामुल्य पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.iasnashik.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आयबीपीएसमार्फत बँकांमध्ये लिपीक पदाची संयुक्त भरती (१३४३ जागा)
इन्स्टिट्युट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्शनमार्फत महाराष्ट्रात लिपीक पदाच्या (१३४३ जागा) भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या १९१ जागा
पंजाब नॅशनल बँकेत मुख्य व्यवस्थापक (आर्किटेक्ट) (१ जागा), व्यवस्थापक (१७१ जागा), अधिकारी (१९ जागा) अशा एकूण १९१ पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.pnbindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एसबीआय बँकेत विविध पदाच्या ३३ जागा
भारतीय स्टेट बँकेत उपाध्यक्ष (३ जागा), उत्पादन विकास व्यवस्थापक (३ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (३ जागा), व्यवस्थापक (४ जागा), सहाय्यक उपाध्यक्ष (२० जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज कण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वर्धा जिल्ह्यात तलाठी पदाच्या १३ जागा
वर्धा जिल्ह्यात तलाठी (१३ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.wardha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य आरोग्य सोसायटीमध्ये कंत्राटी पदासाठी थेट मुलाखती
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य सोसायटी, मुंबईमार्फत कंत्राटी पद्धतीने ३१ जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण पदापैकी कार्यक्रम सहायक, स्टेनोग्राफर, बजेट आणि फायनान्स ऑफिसर, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक या चार जागासाठी थेट मुलाखती होणार आहेत. इतर पदासाठी ६ सप्टेंबर २०१६ अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.nrhm.maharashtra.gov.in किंवा www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

अणु ऊर्जा विभागात कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ वखार व्यवस्थापक पदाच्या ८४ जागा
अणु ऊर्जा विभागात कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ वखार व्यवस्थापक (८४ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती https://www.dpsdae.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

धुळे जिल्ह्यात तलाठी पदाच्या १७ जागा
धुळे जिल्ह्यात तलाठी (१७ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.dhule.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र बँकेत विविध पदांच्या १३१५ जागा
महाराष्ट्र बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (५०० जागा), सिनीअर मॅनेजर (१०० जागा), मॅनेजर (२०० जागा), सिक्युरिटी ऑफिसर (१५ जागा), क्लर्क (२०० जागा), लीगल असिस्टंट (१०० जागा), ॲग्रीकल्चर असिस्टंट (२०० जागा) अशा एकूण १३१५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी १२ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १४६ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक संचालक (७ जागा), वरिष्ठ शास्त्रज्ञ अधिकारी (४ जागा), सहाय्यक अभियंता (९ जागा), विशेषज्ञ (१०६ जागा), सह संचालक (१ जागा), असिस्टंट डायरेक्टर जनरल (१ जागा), वरिष्ठ व्याख्याता (१७ जागा), वास्तुविशारद (१ जागा) अशा एकूण १४६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती http://www.upsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमएमआरडीएमध्ये विविध पदांच्या ५ जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये वरिष्ठ समाज विकास अधिकारी (२ जागा), समाज विकास अधिकारी (२ जागा), विधी अधिकारी (१ जागा) अशा एकूण ५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध (दि. १७ ऑगस्ट) झाल्यापासून १५ दिवस आहे. अधिक माहिती http://mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हिंगोली जिल्ह्यात तलाठी पदाच्या ६ जागा
हिंगोली जिल्ह्यात तलाठी (६ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तलाठी पदाच्या १७ जागा
नंदुरबार जिल्ह्यातील तलाठी (१७ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.nandurbar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नेहरु सायन्स सेंटरमध्ये कनिष्ठ लिपीक पदासाठी विकलांग (अंध) व्यक्तींची भरती
नेहरु सायन्स सेंटरमध्ये कनिष्ठ लिपीक पदासाठी विकलांग (अंध) व्यक्ती भरतीअंतर्गत अंध व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.nehrusciencecentre.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नेहरु सायन्स सेंटरमध्ये विविध पदांच्या ९ जागा
नेहरु सायन्स सेंटरमध्ये प्रदर्शन सहायक (१ जागा), तांत्रिक सहायक (१ जागा), प्रशिक्षणार्थी (७ जागा) अशा एकूण ९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.nehrusciencecentre.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमएमआरडीएमध्ये अभियंता पदाच्या ६ जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कार्यकारी अभियंता (माहिती व तंत्रज्ञान) (१ जागा), कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा स्त्रोत व्यवस्थापन) (१ जागा) उप अभियंता (माहिती व तंत्रज्ञान) (१ जागा), उप अभियंता (पाणी पुरवठा स्त्रोत व्यवस्थापन) (३ जागा) अशा एकूण ६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची ३१ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती https://mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या ८ जागा
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या ८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.washim.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अग्निशामक पदाच्या ७७४ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशमन दलात ‘अग्निशामक’ पदाच्या ७७४ जागा सरळसेवेने वॉक-इन-सिलेक्शन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. १२वी परीक्षेच्या गुणांच्या टक्केवारीनुसार मुलाखतींचा कालावधी दि. १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१६ असा आहे. अधिक माहितीसाठी दै.लोकमतचा दि. ४ ऑगस्ट २०१६ रोजीचा अंक पहावा.

माझगाव डॉकमध्ये एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदाच्या ४ जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (एचआर) या पदाच्या ४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.mazdock.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन
सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.

 
'नोकरी शोधा’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा