महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
छाननी समितीच्या प्राथमिक अहवालावर 7 मे पर्यंत हरकती व सूचना पाठवाव्यात मंगळवार, ३० एप्रिल, २०१३
मुंबई : स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2013 अन्वये मुंबई विभागासाठी नवीन शाळा स्थापन करणे अथवा अस्तित्वात असलेल्या विद्यमान शाळांची दर्जावाढ करण्याकरीता सन 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरीता प्राप्त झालेल्या अर्जांच्या संदर्भात छाननी समितीकडून प्राप्त झालेला प्राथमिक अहवाल www.mahdoesecondary.comwww.depmah.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालासंदर्भात अध्यक्ष अथवा सदस्य सचिव यांना समक्ष भेटता येईल. तसेच दिनांक 7 मे, 2013 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत हरकती आणि आक्षेप तसेच सूचना देता येतील, असे शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग, मुंबई यांनी कळविले आहे.

शिक्षण निरीक्षक दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबई विभाग आणि शिक्षाधिकारी (प्राथमिक आणि माध्यमिक) जिल्हा परिषद ठाणे व रायगड या कार्यक्षेत्राकरिता अर्ज मागविण्यात आले होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा